पुणे जिल्हा ‘जटामुक्त’ करणाऱ्या नंदिनी जाधव
जटा निर्माण होण्यामध्ये काही वेळा बायकांच्या कामाचं स्वरूपही कारणीभूत असतं. कचरा वेचणं, वाळू-मातीतलं काम करणं, शेतातलं काम करणं. त्यांच्या कामातून कचरा, माती किंवा शेतकरी बायांबाबत एखाद गवत केसात अडकतं आणि पुढे जटा तयार होतात. केसांची अस्वच्छता हा जटांना आमंत्रित करणारा प्रकार. आपले केस स्वच्छ धुणं, गुंता झाल्यास नीट सोडवणं, एक एक केस मोकळं करणं, वेळोवेळी तेल लावणं या गोष्टी केल्यास जटा होण्याचं कारणच नाही.......